दिल्लीत कोकणी अकादमीची स्थापना करणार

दैनिक गोमन्तक
शनिवार, 9 जानेवारी 2021

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत कोकणी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पणजी: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत कोकणी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली संघप्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनीच ट्विटरवरून दिली आहे.

यामुळे समाज माध्यमावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. गोवा सरकारने कोकणी अकादमीकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबल्याने आम आदमी पक्षाच्या सरकारला दिल्लीत कोकणी अकादमी स्थापन करावी लागल्याची शेरेबाजी केल्याचे दिसून येते. मागेही राज्यातील जनतेला संबोधित करताना मुद्दामहून कोकणी शब्दांचा वापर केजरीवाल यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला केला होता. आम आदमी पक्षाने आपला एक उमेदवार जिल्हा पंचायत निवडणुकीत निवडून आणला आहे. 

पक्षाने विधानसभेच्या येत्या निवडणुकीत उमेदवार निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम आदमी पक्षाने सरकारवर सातत्याने टीका चालवली आहे. मध्यंतरी वीजमंत्री नीलेश काब्राल यांना चर्चेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मोफत वीज, पाणी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता कोकणी अकादमीच्या स्थापनेच्या माध्यमातून ते जनतेशी भावनिक जवळीक साधू पाहत असल्याचे दिसते.

आणखी वाचा:

काळीज पिळवटून टाकणारी घटना.. रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांचा मृत्यु -

संबंधित बातम्या