आर्यन खानचा कोठडीतील मुक्काम वाढला, जमीन अर्जावर बुधवारी सुनावणी

आम्ली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नाही.
आर्यन खानचा कोठडीतील मुक्काम वाढला, जमीन अर्जावर बुधवारी सुनावणी
Aryan Khan bail hearing on Wednesday Dainik Gomantak

आर्यनच्या वतीने सतीश मानेशिंदे आणि त्यांची टीम न्यायालयात उपस्थित होती . आरोपी आर्यन खानचे वकील सतीश मनेशिंदे म्हणाले, "जर जामीन अर्ज फेटाळला गेला तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ हे स्वाभाविक आहे. आम्ही येथे जामीन अर्ज दाखल केला आहे. ज्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता होती मात्र झाली नाही . "

याआधी शुक्रवारी मुंबई न्यायालयाने आर्यन खान आणि इतर दोघांची जामीन याचिका फेटाळली होती. आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली असता त्यांना जमीन देणे शक्य नेमही असे सांगण्यात आले होते.

Related Stories

No stories found.