क्रूरतेचा कळस...एका अल्पवयीन मुलीवर 400 नराधमांनी केला बलात्कार

आरोपींमध्ये पोलिसांचाही समावेश; गर्भवती पीडित..
क्रूरतेचा कळस...एका अल्पवयीन मुलीवर 400 नराधमांनी केला बलात्कार
Rape Case : क्रूरतेचा कळस...एका अल्पवयीन मुलीवर 400 नराधमांनी केला बलात्कारDainik Gomantak

देशात महिला आणि मुलींच्या बलात्काराच्या आणि लैंगिक छळाच्या घटना रोजच ऐकायला मिळतात. पण महाराष्ट्रातून (Maharashtra) समोर आलेली एक घटना अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी आहे. अंबेजोगाई येथे नोकरीचे आमिष दाखवून दोन नराधमांनी अल्पवयीन मुलीचा (Rape Case) विनयभंग केला असून एका पोलिसासह अन्य 100 जणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. 6 महिन्यांत सुमारे 400 लोकांनी या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असून संबंधित अल्पवयीन मुलगी आता गरोदर आहे.

Rape Case : क्रूरतेचा कळस...एका अल्पवयीन मुलीवर 400 नराधमांनी केला बलात्कार
महाराष्ट्रातील जनतेला पेट्रोल-डिझेल दरवाढीला तूर्तास दिलासा नाही; अजित पवार

डोंबिवलीत काही आठवड्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर 33 मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या या घटनेनंतर लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.

या नव्या बलात्कार प्रकरणात हाती आलेल्या वृत्तानुसार पीडित अल्पवयीन मुलीच्या आईचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचे लग्न केले. सुमारे एक वर्ष सासरच्या घरी राहिल्यानंतर ती घरी परतली दरम्यान सासऱ्यांनीही तिचा विनयभंग केला होता.

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण संपूर्ण प्रकरण जाणून घ्या?

याआधी एका अल्पवयीन मुलीने डोंबिवलीतील विविध भागात 29 जानेवारी ते 22 सप्टेंबरदरम्यान सुमारे 33 तरुणांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या वर्षी जानेवारी महिन्यात एका आरोपीने मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्याची धमकी देऊन वेगवेगळ्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. सामूहिक बलात्काराचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Rape Case : क्रूरतेचा कळस...एका अल्पवयीन मुलीवर 400 नराधमांनी केला बलात्कार
कोकणच्या तिलारीत भूकंपाचे सौम्य धक्के

नोकरीचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार

अंबेजोगाई येथे एका अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोघांनी लैंगिक अत्याचार केला. यानंतर एका पोलिसासह अन्य 100 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. 6 महिन्यांत सुमारे 400 लोकांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित अल्पवयीन मुलगी सध्या 2 महिन्यांची गर्भवती आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. पीडितेने या मुलाला जन्म देऊ नये म्हणून गर्भपाताची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com