दहावीच्या बोर्ड परीक्षांचे मूल्यांकन सूत्र अद्याप तयार झाले नाही

SSC Board Exam.jpg
SSC Board Exam.jpg

नवी दिल्ली :  कोविड 19 विषाणू संक्रमणामुळे देशभरातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला होता.  त्यानंतर अनेक राज्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. तर काही राज्यांनी परीक्षा  रद्द करणार नसल्याची घोषणा केली. महाराष्ट्र सरकारनेही परीक्षा रद्द करणार नसल्याचे आधी म्हटले होते. मात्र देशातील कोविड 19 चा प्रभाव पाहता या परीक्षा कधी होणार आणि विद्यार्थ्याना पुढील वर्गात जाण्यासाठी मूल्याकंन कसे करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता.  अशा परिस्थितीत  महाराष्ट्रातील दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात यासाठी  प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी पार पडली.  (Assessment formula for 10th board exams not ready yet) 

मुंबई उच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती एस.जे.काठवाला आणि न्यायमूर्ती एस.पी. तावडे यांचे खंडपीठासमोर आज  सुनावणी पार पडली. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षाबाबत मूल्यांकन/ गुणांकन  कसे करावे, याबाबत अद्याप कोणतेही सूत्र तयार करण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएसएचएसई) दिले आहे.   भारतीय माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र मंडळ (ICSE)आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  (CBCE)अशाच निर्णयांना याचिकेत आव्हानही देण्यात आले आहे. 

धनंजय कुलकर्णी  यांच्या वतीने त्यांचे वकील उदय वरुंजीकर यांनी सोमवारी न्यायालयात असा युक्तिवाद केला. प्रत्येक शिक्षण मंडळाची  गुणांकन व्यवस्था वेगवेगळी असल्याने विद्यार्थ्याना अकरावीला प्रवेश घेतला अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे  यासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून याबाबत एकसमान धोरण तयार करावे, असा युक्तिवाद उदय वरुंजीकर यांनी केला. तर दुसरीकडे सीबीएसई बोर्डावर केंद्राचे काहीसे नियंत्रण आहे पण आयसीएसई आणि एसएससी बोर्ड स्वायत्त आहेत, त्यामुळे त्यांचे त्यांच्यावर केंद्राचे नियंत्रण नाही, असे संगत केंद्र सरकारचे वकील संदेश पाटील यांनी आपली बाजू मांडली. 

तर, संबंधित याचिका दाखल करण्यासाठी खूप घाई केली असल्याचे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र मंडळाचे  (SSC) वकील किरण गांधी यांनी कोर्टाला सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे वाटप करायचे याबाबत अद्याप कोणतेही  सूत्र तयार करण्यात आले नसून आता मंडळाची परीक्षा समिती त्यावर एक फॉर्म्युला तयार करुन अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवेल, असे वकील किरण गांधी यांनी  न्यायालयासमोर स्पष्ट केले.  तथापि, न्यायालयाने एसएससी, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि भारतीय माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र मंडळ यांना या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मे रोजी म्हणजेच उद्या होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com