धावपटू अविनाश साबळेने 30 वर्ष जुना विक्रम मोडत देशाचे नाव उंचावले

अविनाशचे कुटुंबीय शेतकरी आहेत.
Avinash Sable
Avinash Sable Dainik Gomantak

बीड: येथील मांडावा गावात जन्मलेल्या धावपटू अविनाश साबळेने पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे नाव उंचावले आहे. अविनाशने अमेरिकेतील सॅन जुआण कॅपिस्टानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये पाच हजार मीटर शर्यतीत धावून 30 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. अविनाशच्या आधी हा विक्रम बहादूर प्रसाद यांच्या नावावर होता. (Athlete Avinash Sable breaks 30 year old running record)

Avinash Sable
चेतेश्वर पुजाराची दमदार कामगिरी, भारतीय संघामध्ये होणार पुनरागमन?

अविनाशचे कुटुंबीय शेतकरी आहेत. या आधीही अविनाशने अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. वयाच्या सोळाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करत आहे. कुटुंबीयांनी त्याला कायम साथ दिली.

Avinash Sable
पेडे-म्हापसा : गोव्याचे पुदुचेरीवर अर्धा डझन गोल

अविनाशला टोकियो ऑलिम्पिकमच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले होते. मात्र यामुळे तो खचून गेला नाही. त्याने जिद्दीने आपला सराव सुरू ठेवला. पुढे स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. त्याने केलेल्या या नव्या विक्रमामुळे आता अविनाशला आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस आणि पाच हजार मीटर या दोन्ही प्रकारात उतरवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com