कंपनी असावी तर अशी! बजाजचा कामगारांसाठी मोठा निर्णय

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

बजाज ऑटोने घेतलेल्या या निर्णयामुळे कामगारांना मोठी मदत मिळणार आहे.

देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Corona Second Wave) गंभीर परिस्थिती असून या परिस्थितीचा सर्वच स्थरावर मोठा परिणाम  आहे. या परिस्थीचीमुळे आर्थिक (economy) चक्र ढासळले असून सर्वसामान्य कामगारांवर  (Workers) मोठा परिणाम होतो आहे. त्यामुळे देशातील कामगार सध्या अडचणीत असल्याचे पाहायला मिळते आहे.मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील बजाज ऑटोने आपल्या कामगारांसाठी मोठा निर्णय  घेतला आहे. बजाज ऑटोने (Bjaja Auto) घेतलेल्या या निर्णयामुळे कामगारांना मोठी मदत मिळणार आहे. (Bajaj Auto's big decision for workers in Corona Pandemic)

कोरोना परिस्थितीमध्ये एकीकडे कंपन्या बंद होणे, कामगारांना रोजगार न मिळणे यामुळे कामगारांवर मोठे संकट ओढवले असल्याचे पाहायला मिळते आहे. तर दुसऱ्या बाजूला बजाज ऑटोने कोरोना परिस्थितीमुळे  अडचणीत असलेल्या कामगारांना आर्थिक मदत आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीतील कामगारांना राखीव बेड सारख्या सुविधांपासून ते जर दुर्दैवाने एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यास  त्या कामगाराच्या कुटुंबियांचे आर्थिक मदत देखील दिली जाणारा आहे. त्यानुसार एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यास त्या कामगाराचा पगार बंद न करता पुढील 2 वर्ष तो त्याच्या कुटुंबियाला देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी देखील मदत केली जाणार आहे. तर कुटुंबियांसाठी पाच वर्षाचा आरोग्य विमा देखील देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे 2000 हजारांहून अधिक रुग्ण

यापूर्वी कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेत बजाजने महाराष्ट्राच्या वेगवगेळ्या शहरात असणाऱ्या प्लांटच्या माध्यमातून कामगारांसाठी बेड राखीव ठेवले होते. कोरोनाच्या या संकटात देशातील अनेक उद्योजक मदतीसाठी धावून येत असताना त्यात आता बजाजचे नाव सुद्धा समाविष्टझाले आहे. 

संबंधित बातम्या