
Maharashtra Congress: बाळासाहेब थोरात यांना कॉंग्रेसच्या गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. थोरात यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे, पटोलांवर नाराज असल्याने बाळासाहेब थोरात यांनी हा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.
नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते अशी चर्चा सुरू असतानाच थोरात यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल घेतली असून प्रभारी एच के पाटील मुंबई( Mumbai )कडे रवाना झाले आहेत. पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवले असून बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एच के पाटील हे थोरातांची समजूत काढणार असल्याचे म्हटले जात आहे. बाळासाहेब थोरात हे पक्षाचे जेष्ठ नेते आहेत, त्यांचा राजीनामा हा व्यथित करणारा आहे. त्यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या नेत्यानी आणि हायकमांड यांनी विचार करायला हवा,असे सुधीर तांबेंनी म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याचे आपल्याला सांगितले होते, असे अजित पवार( Ajit Pawar ) यांनी म्हटले आहे. दरम्यान, थोरात यांनी आपल्या वाढदिवसादिवशीच गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.