महाराष्ट्रात भरतीला वर्षभर ब्रेक 

Maharashtra govt
Maharashtra govt

तात्या लांडगे
सोलापूर

तत्कालीन फडणवीस सरकारने घोषित केलेली शासकीय मेगाभरती कोरोनामुळे आता पुन्हा लांबणीवर पडली आहे. राज्याच्या तिजोरीत दरमहा सरासरी 26 हजार कोटींचा महसूल जमा होणे अपेक्षित असतानाही एप्रिल व मे महिन्यात अवघा 13 हजार कोटींचा महसूल जमा झाला. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने खर्चावर नियंत्रण आणले असून आरोग्य विभागाशिवाय कोणत्याही विभागांची पदभरती होणार नसल्याने स्पष्ट केले आहे. 
राज्य सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये सुमारे 16 लाख अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या नऊ लाखांपर्यंत आहे. त्यासाठी सरकारच्या तिजोरीतून दरमहा 12 हजार कोटी रुपये द्यावे लागतात, अशी माहिती वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल यांनी दिली. दरम्यान, राज्य सरकारने 2020-21 मध्ये तीन लाख नऊ हजार कोटी रुपयांच्या महसुली उत्पन्नाचे उद्दिष्टे ठेवले आहे. मात्र, मागील अडीच महिन्यात सरकारला अपेक्षित महसूल मिळालेला नाही. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढल्याने सरकारने नव्या पदभरतीला ब्रेक लावला आहे. परंतु, राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी घेत राज्य सरकार पुढील वर्षी एक लाख पदांची मेगाभरती करण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी महाआयटीतर्फे खासगी संस्था नियुक्‍तीची कार्यवाही सुरुच ठेवली आहे. 

राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार... 
- कोणत्याही विभागांनी नव्या योजना प्रस्तावीत केल्या जाणार नाहीत 
- वेतन, निवृत्ती वेतन व सहायक अनुदानाबाबत घ्यावी वित्त विभागाची परवानगी 
- आरोग्यविषयक वगळता अन्य खर्च वित्त विभागाच्या परवानगीशिवाय खर्च करता येणार नाही 
- वित्त विभागाच्या परवानगीने सर्व विभागांनी भांडवली खर्चाऐवजी अत्यावश्‍यक बाबींवरच करावा खर्च 
- राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येईपर्यंत आरोग्य विभागाशिवाय अन्य विभागाची होणार नाही पदभरती 

राज्याच्या तिजोरीची स्थिती 
महसुली उद्दिष्टे 
3.09 लाख कोटी 
एप्रिल-मेमधील जमा महसूल 
13 हजार कोटी 
राज्य सरकारी कर्मचारी (सेवानिवृत्तांसह) 
25 लाख 
वेतन, निवृत्ती वेतनावरील दरमहा खर्च 
12 हजार कोटी
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com