कर्नाटकातील गुटखा गोव्यामार्गे कोकणात

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्रात गुटखाबंदी होऊन आठ वर्षे झाली; मात्र कर्नाटकातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे. कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे कोकणात येत आहे. छोट्या-मोठ्या वाहनांबरोबर कंटेनरमधून गुटख्याची तस्करी होत असून त्याला काहींचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. 

चिपळूण : महाराष्ट्रात गुटखाबंदी होऊन आठ वर्षे झाली; मात्र कर्नाटकातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे. कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे कोकणात येत आहे. छोट्या-मोठ्या वाहनांबरोबर कंटेनरमधून गुटख्याची तस्करी होत असून त्याला काहींचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. 

चिपळुणातील नागरिकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने २६ लाखाच्या गुटख्याची तस्करी उघड केली. या प्रकरणी चिपळुणातील मुश्‍ताक कच्छी आणि सिंधुदुर्गातील दोन वाहनचालकांना अटक केली होती. कच्छी हा सिंधुदुर्गातील भूषण शिरसाट या व्यक्तीकडून गुटखा विकत घ्यायचा, हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. शिरसाट हा कर्नाटकमधून गुटखा विकत आणायचा, असे त्याने पोलिसांना सांगितले. 

२०१२ मध्ये गुटखाबंदी केली पण प्रभावी अंमलबजावणीअभावी राजरोस खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. बंदीमुळे अधिकृत गुटख्याच्या ब्रॅंडनी राज्यातील कारखाने बंद केले तर काहींनी गुजरात व कर्नाटकात कारखाने हलवले. चिपळूणसह जिल्ह्यात काही ठिकाणी अनधिकृत कारखाने सुरू झालेत. त्याशिवाय कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे रत्नागिरी व सिंधुदुर्गात आणला जात आहे. गुटखा तयार करणारे कारखानदार, वितरक, विक्रेते यांनी समांतर यंत्रणा उभी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून छोट्या, मोठ्या वाहनांतून गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. २६ लाखाचा गुटखा चिपळूणपर्यंत आला. त्याची माहिती संबंधित खात्याला मिळाली नाही.

संबंधित बातम्या