Swine Flu in Maharashtra: काळजी घ्या! महाराष्ट्रात स्वाईन प्लूचा उद्रेक

राज्यामध्ये कॉलराचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यानंतर, महाराष्ट्राने आता 2022 च्या पहिल्या सात महिन्यांत गेल्या वर्षीच्या स्वाइन फ्लूच्या संख्येला देखील मागे टाकले आहे.
Swine Flu in Maharashtra
Swine Flu in MaharashtraDainik Gomantak

राज्यामध्ये कॉलराचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यानंतर, महाराष्ट्राने आता 2022 च्या पहिल्या सात महिन्यांत गेल्या वर्षीच्या स्वाइन फ्लूच्या संख्येला देखील मागे टाकले आहे. स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत 10 पटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. स्वाइन फ्लू हा डुकरांमध्ये इन्फ्लूएंझा स्ट्रेनमुळे होणारा मानवी श्वसन संसर्ग आहे तर 2020 मध्ये, राज्यात तीन मृत्यूंसह 129 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले, तर संसर्गामुळे 387 प्रकरणे आणि दोन मृत्यू झाले आहेत. (Be careful Swine flu outbreak in Maharashtra)

Swine Flu in Maharashtra
Maharashtra मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत

यावर्षी, 31 जुलैपर्यंत, पहिल्या सात महिन्यांत 42.6 टक्क्यांनी वाढ नोंदवून एकूण प्रकरणांची संख्या 552 वर गेली आहे. तसेच स्वाइन फ्लूमुळे मृत्यूचे प्रमाण 20 वर पोहोचले आहे, जे 2020 नंतरचे सर्वाधिक असल्याचे सांगतिले जात आहे.

मुंबईत एकूण 142 प्रकरणे

मुंबईत एकूण 142 स्वाइन फ्लूची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापाठोपाठ पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले क्षेत्र, जेथे 114 रुग्ण संसर्गाने आढळून आले आहेत, त्यापैकी आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्यूची संख्या जी महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.

ठाण्यात स्वाइन फ्लूचे 82 रुग्ण आढळून आले असून तीन जणांचा मृत्यू झाला तसेच कोल्हापुरात एकूण 54 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आकडा असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

Swine Flu in Maharashtra
Patra Chawl land case: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने बजावले समन्स

मासिक प्रकरणे दुप्पट

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास असे दिसून आले की मासिक रुग्णांची संख्या दोन पटींनी वाढली आहे. 2021 मध्ये, राज्यात दरमहा सरासरी 32 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले, जे गेल्या सात महिन्यांत दुप्पट होऊन त्याचा आकडा 79 वर पोहोचला आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलैपर्यंत राज्यभरात एकूण 5,77,847 स्वाइन फ्लूच्या रुग्णांची तपासणी देखील करण्यात आली आहे. वृत्तानुसार तपासणी केलेल्यांपैकी 7,093 संशयित फ्लू रूग्णांवर ओसेल्टामिविर या औषधाने उपचार करण्यात आले, हे औषध इन्फ्लूएंझाच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी डॉक्टरांकडून शिफारस केलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com