२१ जानेवारीला `मोर्चा भव्य करू; ताकदही दाखवू`

दैनिक गोमन्तक
रविवार, 10 जानेवारी 2021

बेळगाव हे सीमाप्रश्‍नाचा केंद्रबिंदू आहे.२१ जानेवारीला होणाऱ्या मोर्चाला समितीच्या माजी नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागातून किमान १०० जण आणावेत. यामुळे मोर्चा भव्य होईलच,

बेळगाव: बेळगाव हे सीमाप्रश्‍नाचा केंद्रबिंदू आहे. कन्नड संघटनांनी महापालिकेसमोरच लावलेला लाल-पिवळा झेंडा काढण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषक झटत आहेत. त्यामुळे बेळगावातील मराठी माणसानेही पेटून उठणे आवश्‍यक आहे.

यासाठी २१ जानेवारीला होणाऱ्या मोर्चाला समितीच्या माजी नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागातून किमान १०० जण आणावेत. यामुळे मोर्चा भव्य होईलच, पण प्रशासनाला एकी दिसेल, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले. मराठा मंदिर येथे आज ही बैठक झाली. व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, एल. आय. पाटील, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, माधुरी हेगडे होत्या.

संबंधित बातम्या