खबरदार ! कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले नाही तर...

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 26 मार्च 2021

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल

पुणे :  महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून शहरी भागच नाही तर ग्रामीण भागालाही या लाटेने आपल्या विळख्यात घेतले आहे. चिंताजनक बाब म्हणजे  पुणे शहरात रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा  बैठक घेतली. या बैठकीनंतर सर्व त्यांनी पत्रकार परिषदेत पुण्यातील कोरोना परिस्थिती सांगत नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असे संकेत दिले आहेत. तसेच, लॉकडाऊन लावला तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होईल आणि तो होऊ द्यायचा नाही,  म्हणून नागरिकांनी कोरोना नियमावलीचे सक्तीने पालन करणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

Holi 2021 Guidelines: तुमच्या राज्यातील होळीसाठी कोरोना मार्गदर्शक सूचना जाणून...

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पुण्यात सध्या तरी लॉकडाऊनचा करण्यात येणार नाही.  मात्र आज झालेल्या बैठकीत वैद्यकीय क्षेत्रातीलच नव्हे तर इतर क्षेत्रातील तज्ञांनीदेखील असे सांगितले आहे  की, जर कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन करावाच लागेल. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली नाही तर नाईलाजास्तव  2 एप्रिल पासून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.  त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसांत जर रुग्णसंख्या आटोक्यात आली नाहीतर लॉकडाऊनशिवाय  पर्याय राहणार नाही. असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिल. 

मॉडर्न ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या अध्यक्षांची मालमत्ता जप्त; बनावट पदवी प्रकरण...

त्याचबरोबर, शहरातील कोरोना रुग्णांसंख्या वाढल्यास त्यांच्यासाठी खाजगी रुग्णालयाचे 50 टक्के  बेड ताब्यात घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच लसीकरण केंद्र  दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लसीकरण केंद्राची संख्या 300  वरून 600 पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय लसीचे अतिरिक्त डोस पुरवण्याची मागणी केंद्रसकरकडे करण्यात आली असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मदत करण्याचे आश्वासन दिलं असल्याच  अजित पवार यांनी सांगितले.  त्याचबरोबर, त्यांनी पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. यानुसार, 'जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची संख्या वाढवावी, ग्रामीण भागापासून  शहरी  भागापर्यंत रुग्णवाहिका पोहचेल यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहे. त्याचबरोबर नियमावलीदेखील प्रसिद्ध केली आहे. यानुसार, 

-एप्रिलपासून  सर्व लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद
-सार्वजनिक बस वाहतूक सुरू राहील. 
-सार्वजनिक पद्धतीने होळी किंवा इतर कोणताही सण साजरा करू नये
-हाॅटेलबाबत कोणताही बदल नाही. 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रुग्णांची संख्या -आणखी वाढल्यास हाॅटेल बंद करावी लागतील
-30 शाळा-महाविद्यालयं एप्रिलपर्यंत  बंद राहतील.
-मॉल, चित्रपटगृहांसाठी 50 टक्के उपस्थितीचा नियम
-लग्न समारंभात 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. 
-राजकीय कार्यक्रम होणार नाहीत 
-सार्वजनिक उद्याने, सुरू सकाळीच खुली राहतील  

 

संबंधित बातम्या