काळीज पिळवटून टाकणारी घटना.. रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांचा मृत्यु

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जानेवारी 2021

काळीज पिळवटून टाकणारी घटना महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात घडली.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागून दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भंडारा :  काळीज पिळवटून टाकणारी घटना महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात घडली.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागून दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती.धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाला. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघाल्याचं दिसल्याने ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.

संबंधित बातम्या