Bhandup Hospital Fire: भांडूपच्या कोविड रुग्णालयाला भीषण आग; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

डूप येथील ड्रीम मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. रात्री 12 वाजताच्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई: मुंबईतील भांडूप येथे ड्रीम मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. काल रात्री 12 वाजताच्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या मॉलमध्येच सनराईज हे कोविड रुग्णालय आहे. या भीषण आगीत 9 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अजूनही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत आहेत. गेल्या 6 ते 7 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असतांना, मात्र ही आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही.

या मॉलमधून आतापर्यंत 61 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे आगीच्या घटनेची माहिती समजताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग मॉलच्या चारही बाजूने पसरली आहे. त्यामुळे अग्निशमन दलातीन जवानांना ही आग विझवताना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

एनआयए कोर्टाने आता पुन्हा सचिन वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात सुनावली आहे

भांडूप पश्चिम भागात एक प्रसिद्ध ड्रीम मॉल आहे. या मॉलमध्ये मध्यरात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली. याच मॉलमध्ये सनराईज रुग्णालय आहे.  सनराईज रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मॉलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. मात्र हळूहळू आगीनं रौद्ररुप धारण केलं आणि आग मॉलमध्ये असलेल्या रुग्णालयात पसरत गेली.सध्या 76 रुग्णांवर या रुगालयात उपचार केले जात होते. त्यातील दोघांचा या आगीत मृत्यू झाला आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहचल्या.

परमबीर सिंग प्रकरणात शरद पवारांच्याच चौकशीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका 

किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आणि महापौरांनी बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले. या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही च्यांनी दिले. आणि महत्वाचं म्हणजे, कोविड रुग्णालय हे ड्रीम मॉलमध्ये कसं गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठे आश्चर्य व्यक्त केले आहे. 

संबंधित बातम्या