सचिन वाझे प्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

मुकेश अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून सुरु झालेल्या वादात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.

मुकेश अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या कारचे मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून सुरु झालेल्या वादात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. या प्रकरणाचा तपास सध्या केंद्रीय तपास यंत्रणा करत असतानाच आज या प्रकरणात राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Big decision of state government in Sachin Waze case Hemant Nagrale selected as New Mumbai Police Commissioner)

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या ट्विटर खात्यावरून वरून दिली. तसेच रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार संपविण्यात आला आहे. याशिवाय, संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची आणि परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी देण्यात आली आहे.   

कोण आहेत हेमंत नगराळे ?

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आय.पी.एस. अधिकारी असून आता,परमवीर सिंग यांच्या बदली नंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून ते रुजू होणार आहेत. या आधी हेमंत नगराळे यांनी 2016 साली मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र 2018 साली त्यांची बदली नागपूरला करण्यात आली. राज्यभर चर्चा झालेल्या मुंबईच्या वाशी परिसरातील बँक ऑफ बडोदा बँकेवर पडलेल्या दरोड्याचा त्यांनी 2 दिवसात तपास लावला होता.

सचिन वाझे प्रकरणात एनआयएला मिळाले महत्वाचे धागेदोरे  

हेमंत नगराळे (Big decision of state government in Sachin Waze case Hemant Nagrale selected as New Mumbai Police Commissioner) यांनी नागपूर मधील व्ही. एन.आय.टी. महाविद्यालयातून आपले इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर मुंबईतील जे.बी.आय.एस.एम महाविद्यालयातून मास्टर ऑफ फायनान्स मॅनेजमेंटची पदवी पूर्ण केली आहे. पोलीस दलात काम करत असताना राष्ट्रपतींचे पोलीस पदक तसेच विश्व सेवा पदकाने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. हेमंत नगराळे हे जुडो मधील ब्लॅक बेल्ट आहेत. त्यांची पहिलीच नियुक्ती गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात झाली होती. व पोलीस दलातील त्यांची कारकीर्द गाजलेली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एक स्फोटकांनी भरलेली संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. आणि या घटनेच्या एका आठवड्यानंतर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तर मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे हे मागील चार महिन्यांपासून ही गाडी चालवत होते. व मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ही कार आढळून आल्यानंतर देखील सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे मिळाली होती. (Sachin Waze)

संबंधित बातम्या