ठाकरे सरकारचा मोठा निर्णय...बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

 

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.सुरक्षेत कपात केल्याच्या निर्णयावरुन पुन्हा एखदा राज्यातील राजकारण तापणार असं दिसतंय.काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील मंत्र्यांना आणि इतर नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेतला होता.त्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.यावेळी भाजप नेत्यांबरोबर इतर पक्षातील नेत्यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेविषयीचा अहवाल मुबंई पोलीसांनी दिला आहे.फडणवीसांच्या सुरक्षेत कपात करू नये असा अहवाल असतानाही त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेण्यात आली आहे.तसेच चंद्रकांत पाटील,विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,आमदार प्रसाद लाड यांच्याही सुक्षक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्राप्त असलेली झेड प्लस सुरक्षा काढून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.त्यांची बुलेटप्रुफ गाडीही काढून घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित बातम्या