'महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव..परभणीतील 800 कोंबड्यांचा मृत्यू'

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जानेवारी 2021

महाराष्ट्र कोरोनाशी लढतो न लढतो, तोच आता बर्ड फ्लूचं नवं संकट समोर उभं ठाकलंय. महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची बातमी निश्चित झाली आहे.

परभणी : महाराष्ट्र कोरोनाशी लढतो न लढतो, तोच आता बर्ड फ्लूचं नवं संकट समोर उभं ठाकलंय. महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची बातमी निश्चित झाली आहे. जिल्ह्यातील मुरुंबा (ता.परभणी) येथील एका कुक्कुटपालन फार्म वरील  800 कोंबड्या 'बर्ड फ्लू'मुळेच मृत झाल्या असल्याचे काल रात्री उशीरा संबंधित प्रयोगशाळेने जिल्हा प्रशासनास कळविले अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोणे यांनी दिली.

 परभणीच्या मुरुंबा इथं बर्ड फ्लूमुळे 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भिताचं वातावरण असून पाटबंधारे विभाग ग्रामपंचायत, वन विभाग, पातळींवर काळजी घेण्याचे आदेशही दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत मुरुंबा गावच्या 2 किलेमीटर आसपास असलेल्या परिसरातील  पाळीव पक्षी नष्ट केले जाणार आहेत. तर, 10 किलोमीटरच्या परिसरात सगळ्या प्रकारच्या  पक्ष्यांच्या वाहतूकीवर निर्बंध घातले आहेत. दरम्यान, कुठेही अशा प्रकारच्या घटना घडल्यास  पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी, उर्वरीत महराष्ट्रात चिकन आणि अंडी खरेदी विक्रीवर आणि खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच अशी गरजही नाही, असं पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर बर्ड फ्लू हा रोग नियंत्रात आणणं शक्य आहे. पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करत आहे. उर्वरीत महराष्ट्रात चिकन आणि अंडी खरेदी विक्रीवर आणि खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच अशी आवश्यकताही नाही, असं पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या