बर्ड फ्लू : राजापुरात पक्षी सर्वेक्षण होणार; अहवाल पॉझिटिव्ह आल्यास 'रेड झोन' जाहिर करणार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

राजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या काही दिवसात आठ पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राजापूर (रत्नागिरी)कोरोनाचा ओघ जरा कुठे ओसरू लागला, तोच आता बर्ड फ्लू थैमान घालतोय. राजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या काही दिवसात आठ पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यात एका कबुतराचा आणि सात कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. हे पक्षी वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले असून, अहवाल प्रलंबित आहे.

मुंबईकरांनो..काळजी घ्या ! शहराचे प्रदूषण धोकादायक पातळीवर 

बर्ड फ्लूचे वाढते संक्रमण बघता पशुसंवर्धन विभागातर्फे राजापूरमध्ये पक्ष्यांच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मृत पक्ष्यांपैकी काही पक्षी जास्त कुजलेल्या, तर काही पक्षी मान नसलेल्या स्थितीमध्ये सापडले होते. या पक्ष्यांव्यतिरिक्त उर्वरित पक्षी वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आल्याचे  पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रमोद सुर्वे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सुरू होणार जेल टूरिझम

पशुसंवर्धन विभागातर्फे बर्ड फ्लूचे वाढते संक्रमण थांबवण्याकरिता पोल्ट्रीधारकांशी संपर्क साधून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपासणीसाठी पाठवलेल्या पक्ष्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्यास गावामध्ये रेड झोन करण्याची तयारी प्रशासनानतर्फे केली जात आहे.

संबंधित बातम्या