महाराष्ट्रावर कोरोना पाठोपाठच आता 'बर्ड फ्लू'चं सावट; 381 पक्षांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्राला कोरोना पाठोपाठच आता बर्ड फ्लूने घेरल्याची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 381 पक्षी मृतावस्थेत सापडले. 

मुंबई : महाराष्ट्राला कोरोना पाठोपाठच आता बर्ड फ्लूने घेरल्याची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 381 पक्षी मृतावस्थेत सापडले. नंदुरबारमध्ये 190 आणि अमरावतीमध्ये 115 कोंबड्या मृतावस्थेत सापडल्या आहेत. यांचे नमुने राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था व बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच आता बर्ड फ्लूनेदेखील डोकं वर काढल्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

मास्क न घालणाऱ्यांकडून मुंबई पालिकेने दंड म्हणून वसूल केले तब्बल 'इतके' रुपये 

नंदूरबारमधील नवामपुरात एकूण 5,86,668 कोंबड्यांसह विविध ठिकाणी एकूण 7,20,515 कोंबड्यांना मारण्यात आल्याची माहिती मारण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या निवेदनात देण्यात आली आहे. त्याच वेळी, संक्रमित क्षेत्रात 26,44,177 अंडी नष्ट करण्यात आली आहेत. संक्रमित विभागातील कुक्कुटपालक शेतकऱ्यांना राज्य सरकारने 3.38 कोटी रुपयांची भरपाई दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा देऊळ बंद; प्रशासन अलर्ट

23 जानेवारीपर्यंत 9 राज्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने दिलेल्या एका निवेदनात  23 जानेवारी 2021 पर्यंत  केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब या नऊ राज्यांमधील पोल्ट्री फार्ममध्ये एव्हीयन इन्फ्लूएन्झाची प्रकरणे आढळली आहेत. मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब मध्ये कावळे, स्थलांतर करणारे पक्षी आणि वन्य पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. तथापि, रुद्रप्रयाग, लॅन्सडाउन वन क्षेत्र आणि उत्तराखंडच्या पौरी वनक्षेत्रातील कावळे, कबूतरांचे नमुने, राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील कबूतरांचे नमुने आणि उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील कावळे आणि मोराच्या नमुन्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएन्झा आढळून आला नाही. 

संबंधित बातम्या