शासकीय कार्यक्रमांवर भाजपचा बहिष्कार

जिल्हातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई (Indemnity)द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारकडे (Government)चिक्कार पैसा आहे मात्र,त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही.
BJP
BJP Dainik Gomantak

औरंगाबाद: हवामान खात्याकडून (weather department)सांगण्यात आले होते राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याप्रमणे राज्यात पावसाचा तडाखा सुरु आहे. औरंगाबाद जिल्हात पावसाची नोंद 65 मिमी झाली. त्या भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना फसवण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकार यांच्या कडून सुरूर आहे. अतिवृष्टी नंतर 72 तासांच्या आत नुकसानी बद्दल सर्व प्रकारची माहिती ऑनलाईन (Online)शेतकऱ्यांना देण्यात यावी. असा नियम आहे. त्याचा फायदा म्हणजे विमा कंपनीच्या भल्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे असा आरोप भाजपचे आमदार(MLA) संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला. याच कारणामुळे मराठवाड्यातील सर्व शासकीय कार्यक्रमांवर भाजपाच्या वतीने आम्ही बहिष्कार टाकत आहोत, अशी माहिती त्यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना दिली.

BJP
Maharashtra: येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

ज्या भागात 65 मिमी पाऊस पडला आहे. त्या भागातील शेतऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. जर सरकार कडून ही मागणी मान्य केली गेली नाही, तर येणाऱ्या काळात पालकमंत्र्यांना (Guardian Minister)घेराव घालू असा इशाराही आमदार निलंगेकर यांनी दिला. तसेच मराठवाड्यातील सर्वच पालकमंत्र्यांना याबाबत आम्ही जाब विचारू असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या(Farmers) नुकसानीची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यामुळे या भागाचे पंचनामे करण्याची गरज नाही असे ते म्हणाले. जिल्हातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारकडे चिक्कार पैसा आहे मात्र,त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही असा आरोपही आमदार निलंगेकर यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com