महाराष्ट्राचं चारित्र्यहनन तुमच्यासारख्या नाकर्त्या राज्यकर्त्यांनीच केलं; भाजपची जहरी टीका

दैनिक गोमंतक
रविवार, 28 मार्च 2021

संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये लिहिलेल्या लेखावरून भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केला आहे. 

राज्यात एकीकडे कोरोनाचा उद्रेक झाला असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. अॅंटीलिया स्फोटक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या मुद्द्यावरुण भाजपाने पुन्हा  एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये लिहिलेल्या लेखावरून भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केला आहे. 

66 वा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर; इरफान खान सर्वोत्कृष्ट अभिनेता तर तापसी पन्नूला... 

भाजपाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस वर निशाना साधताना, 'तुमच्याच कृत्यांमुळे देशभरात महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र पोलिसांची बदनामी झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच, ''गृहमंत्र्यांनी आपल्याच पोलीस बळावर शंका उपस्थित केली. मात्र आता त्यांचंच पितळ उघडं पडलं आहे,'' असेही भाजपाने म्हटले आहे.  तर, ''साधा फौजदार म्हणता आणि त्यालाच इतर अधिकाऱ्यांपेक्षा जास्त महत्त्व देता. हा तपासाचा विषय आहे, हे  माहीत असतानादेखील  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझे यांची पाठराखण का केली? असा सवाल भाजपाने विचारला आहे. त्याचप्रमाणे,  महान महाराष्ट्र राज्याचं तुमच्यासारख्या नाकर्त्या राज्यकर्त्यांनीच सर्वत्र चारित्र्यहनन केलं, अशी घणाघाती टीकाही भाजपाने केली आहे. 

बंगाल निवडणुकीबद्दल अमित शाह यांचा मोठा दावा  

महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भाजपाने टीकेचा भडिमार केला आहे. ''सचिन वाझे हा शिवसेनेचा, गृहमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळातील इतर लोकांचा लाडका आणि भरवशाचा माणूस होता, हे स्वतःसंजय राऊत यांनीच कबूल केलं आहे. वाझे वसुली करत होता, हे सगळ्यांना माहीत होतं. कृत्य बाहेर आलं म्हणून सारवासारव करण्याचा तुमचा कारभार जनतेला माहीत आहे,'' असे भाजपाने म्हटल आहे. तसेच, ''एक मोठ्या हुद्द्यावरचा अधिकारी थेट गृहमंत्र्यांवर आरोप करतो. त्याबद्दल आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक शब्दसुद्धा काढत नाहीत. स्वतःच्या गृहमंत्र्यांवर विश्वास नाही की, त्या अधिकाऱ्यांवर? तुमचं 'डॅमेज' झालेल्या सरकारची झळ महाराष्ट्राच्या जनतेला सोसावी लागत आहे,''  असंही भाजपाने म्हटलं आहे.

'सामना'च्या रोखठोकमध्ये काय म्हटले आहे संजय राऊत यांनी? 

“परमबीर  सिंह हे महत्त्वाकांक्षी अधिकारी असल्याने होमगार्ड महासंचालक पदावर झालेली बदली ते सहन करू शकले नाहीत. अशातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, 'पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले,' असे विधान केल्याने परमबीर सिंग यांच्या विचारात तेल ओतण्याचे काम केले. आणि त्यामउलेच परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी 100 कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचे पत्र मुख्यमंत्र्याना पाठवत मोठा गौप्यस्फोट केला.  आता  मनसुख हिरेन यांच्या हत्येचा आरोप ज्यांच्यावर आहे त्या सचिन वाझेंनाच हे टार्गेट कसे दिले हे प्रकरण देखील कहूकह रहस्यमय झाले आहे. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी?,'' असं राऊत यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या