'महाराष्ट्रातलं आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून 'ईडी'चा वापर'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 डिसेंबर 2020

भाजपकडून ईडी चा वापर महारष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी होत असल्याचा आरोप संजय राऊतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

मुंबई  : भाजपकडून ईडी चा वापर महारष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी होत असल्याचा आरोप संजय राऊतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आम्ही कोणत्याही नोटीशीला घाबरत नसून, ईडी च्या नोटीशीची सन्मान करत उत्तर देऊ, असं संजय राऊत म्हणाले.  शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना काल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. याप्रकरणी त्यांना उद्या (ता. २९) ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती ईडी अधिकाऱ्याने दिली.

पीएमसी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी काही संशयित बॅंक व्यवहार आढळून आले आहेत. त्याची पडताळणी करण्यासाठी वर्षा राऊत यांची चौकशी करणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पीएमसी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून काही जणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचे नाव समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले. ईडीचे संचालक एस. के. मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 नोटिशीमुळे चर्चा

दरम्यान, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस दिली आहे. ते ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून, त्यासाठी बुधवारी (ता. ३०) मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती खडसे यांनी दिली. खडसेंना ईडीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

 

संजय राऊत काय म्हणाले..

  • १० वर्षांपूर्वी केलेल्या व्यवहाराची चौकशी आत्ता का?
  • भाजपकडून ईडी चा वापर महारष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी होत आहे.
  •  ईडी च्या नोटीशीची सन्मान करत उत्तर देऊ
  •  ईडी भाजपचा पोपट असलं, तरी आंम्हाला ईडीबद्दल आदर आहे.
  • ईडीनी भाजपच्या कार्यालयात टेबल टाकलंय का, असा उपहासात्मक प्रश्न संजय राऊतांनी विचारला
  • राजकिय वैफल्यातून भाजपकडून अशी नोटीसा पाठविल्या जात आहेत.

 

संबंधित बातम्या