वादाचा नवा अंक! उध्दव ठाकरे यांच्याविरोधात भाजप करणार तक्रार दाखल

आता भाजप पलटवार म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे.
uddhav thackeray
uddhav thackerayDainik Gomantak

महाराष्ट्रातील राजकिय नाट्याला आता पुन्हा एकदा वेग येऊ लागला आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता भाजप पलटवार म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे.

उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळावा दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याविरोधात टिका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे योगींवर विरोधात केलेल्या विधानावरुन ही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'योगी असेल तर तो मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो, त्याने गुहेत जाऊन बसले पाहिजे' असं वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते.

uddhav thackeray
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

दरम्यान, महाड न्यायालयाने नारायण राणे यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्याविरोधात महाड न्यायालयात सुनावणी सुरु होती. दरम्यान पोलिसांनी न्यायालयात नारायण राणे यांची सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबाबत भाष्य केल्याने पोलिसांनी कोठडी मागितली होती. राणे यांनी केलेल्या वक्तव्यामागे कोणत्या प्रकारचा करण्याचा विचार होता का? याचा तपास करण्यात येत आहे. 153 आणि 505 हे सेक्शन बेकायदेशीरित्या नारायण राणे यांच्याविरोधात पोलिसांनी लावली आहेत, असा युक्तिवाद राणेंच्या वकिलांनी न्यायालयात सुनावणी दरम्यान केला होता.

राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चिघळला

नारायण राणे यांचा राजीनामा घेऊन त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केले आहे. शिवसैनिकांशी लढण्याची भाषा नारायण राणे आणि त्यांच्या चंगू-मंगूने करु नये. नारायण राणेंचा संयम सुटलेला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यलयावर दगड फेक करत तोडफोड केली आहे. तर जूहूमध्ये देखील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदेलन केले. कानफाटात मारण्याची भाषा ही ठाकरी भाषा नाही. असे मुंबई महानगरपालीकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हणले आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे आता याचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. सांगलीत देखील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पोस्टरला काळे फसले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com