'देशविरोधी शक्तींच्या विरोधात भाजप कधीच हातमिळवणी करणार नाही'

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या कार्यकारणी बैठकीमध्ये बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
'देशविरोधी शक्तींच्या विरोधात भाजप कधीच  हातमिळवणी करणार नाही'
Devendra FadnavisDainik Gomantak

महाराष्ट्रातील राजकारण वेगाने बदलू लागले आहे. राजकीय नेते आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. यातच आता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या कार्यकारणी बैठकीमध्ये बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

फडणवीस म्हणाले, ''महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या सरकारामधील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून ठाकरे सरकारची ओळख बनली आहे. त्यामुळे आता या सरकारच्या विरोधात एल्गार करत रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात केवळ भ्रष्टाचार आणि बलात्कार यावरच चर्चा सुरु झाली आहे. देशद्रोह्यांबरोबर सरकारची भागीदारी आहे. त्याचबरोबर त्यांच्या जमीनीही बळकावल्या जातायेत. हजारो कोटींचा भ्रष्टाचार करुन सरकारमधील मंत्री राजरोसपणे फिरत आहेत. भ्रष्ट मार्गाने चालण्याची सवय लागली तर राज्यातील नोकरशाहीचं कस होणार हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आमच्या जवळ इनामी नाही तर बेईमानी नाही. त्यामुळे लढाई ही समोरुन लढावी लागते पाठीमागून नाही.''

Devendra Fadnavis
मुंबई काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी!

दरम्यान फडणवीस पुढे म्हणाले, 'राज्यातील सरकारचं काहीच अस्तित्व उरलेले नाही. कोटी कोटी रुपये देऊन राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचा हा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आम्ही सदैव तयार राहू. राज्यात विकासाबद्दल कोणीच बोलत नाही. त्रिपुरा घटनेवरुन राज्याच्या समर्थनार्थ वेगवेगळे मोर्चे देखील निघत आहेत. पाकिस्तानच्या प्रकल्पाचे फोटो त्रिपुरातील प्रकल्प म्हणून दाखवले जात आहेत. राहुल गांधींना त्रिपुरामध्ये नेमके काय घडले याची कल्पना असूनही ते ट्वीटरवरुन अफवा पसरवत आहेत. जनतेच्या प्रश्नाकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज आहोत. त्याचबरोबर राज्यातील पोलिसांवर ठरवून हल्ले केले जात आहेत.

शिवाय, ते पुढे म्हणाले, 'आता विचाराचा नक्षलवाद कधीच संपला आहे. त्यामुळे आता नक्षलवाद्यांचा रेड कॉरिडॉर बनू लागला आहे. गांजा, हर्बल, ड्रग्ज यावरच राज्यातील सरकार चर्चा करत आहेत. भाजपचे कार्यकर्ते दंगली करणार नाहीत. मात्र एखाद्या निष्पाप अल्पसंख्यांकांवर हल्ला होत असल्यास आम्ही त्याच्यावरील हल्ला परतवून लावू. देशविरोधातील शक्तींच्या विरोधात भाजप कधीच हातमिळवणी करणार नाही. त्यामुळे अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही सोडणार नाही.'

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com