सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची एकहाती सत्ता

निवडणुकीत नारायण राणेंचा महाविकास आघाडीला जोरदार दणका
Sindhudurg District Bank Election

Sindhudurg District Bank Election

Dainik Gomantak

सिंधुदुर्ग : कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sindhudurg District Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. आतापर्यंत भाजपने 10 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.

Sindhudurg District Bank Election

सनबर्न फेस्टिव्हलमध्ये पर्यटकांचे महागडे मोबाईल लंपास

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचाही राणेंच्या पॅनेलने पराभव केला आहे.

Sindhudurg District Bank Election

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

दरम्यान भाजपलाही (bjp) काही जागांवर फटका बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली यांनाही हार पत्करावी लागली आहे. मतमोजणीच्या आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपनं झेंडा रोवण्यात यश मिळवलं आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Election) अनेकांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. अनेक दिग्गजांना निवडणुकीत पराभवाचा सामनाही करावा लागल्याचं चित्र आहे.

Sindhudurg District Bank Election

एकाच महिन्यात पदाधिकाऱ्याचा भाजपला 'रामराम'

सिंधुदुर्गातील या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) कणकवलीत दाखल होणार आहेत.

राणे आणि मविआ नेत्यामधील आरोप-प्रत्यारोपांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच गाजली. मविआकडून निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यावरुन आमदार नितेश राणेंवर आरोपही झाले. त्यामुळे नितेश राणेेनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धावही घेतली होती, मात्र कोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला होता. सध्या नितेश राणे अज्ञातवासात असल्याची माहिती आहे.

आतापर्यंतच्या कुणाकुणाचा विजय

विद्याधर परब - सावंतवाडी - शिवसेना

दिलीप रावराणे - वैभववाडी गट - भाजप

व्हिक्टर डांटस - मालवण - महाविकास आघाडी

गणपत देसाई - दोडामार्ग - शिवसेना

विद्याप्रसाद बांदेकर - कुडाळ - काँग्रेस

विठ्ठल देसाई - कणकवली

मनीष दळवी - वेंगुर्ले - भाजपप्रणित पॅनल

प्रकाश बोडस - देवगड - भाजपप्रणित पॅनेल

अतुल काळसेकर - सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था - भाजप

सुशांत नाईक - सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था - महाविकास आघाडी

गजानन गावडे - औद्योगिक संस्था मजूर संस्था, जंगल कामगार संस्था, मोटार वाहतूक संस्था - भाजप

रविंद्र मडगावकर - इतर मागास मतदार संघ - भाजप

मेघनाद धुरी - विमुक्त भटक्या जमाती - महाविकास आघाडी

आत्माराम ओटवणेकर - अनुसूचित जाती जमाती - महाविकास आघाडी

समीर सावंत - भाजप प्रणितपॅनेल

संदीप उर्फ बाबा परब - गृहनिर्माण संस्था मतदारसंघ - भाजप प्रणित

महेश सारंग - मच्छिमार आणि दुग्ध विकास संस्था - भाजप प्रणित

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com