''10 लाख नोकऱ्या देणार हे आम्ही गेले दोन वर्षे ऐकतोय''

महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा भाजपकडून कायम प्रयत्न
''10  लाख नोकऱ्या देणार हे आम्ही गेले दोन वर्षे ऐकतोय''
Sanjay RautDainik Gomantak

आदित्य ठाकरे आयोद्या दौऱ्यावर असणार आहेत. यानिमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. यामध्ये राज्यसभा निवडणूक, मुख्यमंत्री पंतप्रधान एका व्यासपीठीवर असणार, 10 लाख नोकऱ्या देणार हे पंतप्रधानांनी केलेली घोषणा, आणि भाजपकडून जाणिवपुर्वक छळ सुरु आहे. या मुद्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केले. (BJP's attempt to discredit Mahavikas Aghadi )

आदित्य ठाकरे उद्या आयोद्या दौऱ्यावर असणार आहेत. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आयोद्या दौऱ्यावर असणार आहेत. याबाबत आम्ही कोणते ही राजकिय भाष्य करणार नाही. कारण आयोद्या हे भगवान श्री रामांच्या सानिध्याने पावन झालेली भुमी आहे. आणि ती आमच्यासाठी कायमच पवित्र असणार आहे.तसेच ही जागा सर्वांना प्रेरणा देणारी असल्याचं ही ते यावेळी म्हणाले.

Sanjay Raut
'भारत सरकारने मुस्लिमांची माफी मागावी',ठाणे शहर पोलिसांची अधिकृत वेबसाइट हॅक करून दिला संदेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आयोद्या दौऱ्यावरुन आले आणि भगवान श्री रामांच्या आशिर्वादामूळे महाराष्ट्रातील कोरोना ही कमी झाल्याचं ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील काही नेते फक्त आणि फक्त विरोध करणे हेच त्यांचं ध्येय आहे. असा आरोप त्यांनी अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षांना लगावला. तसेच आमच्याकडे फक्त 42 मते असताना या मतांच्या जोरावर आम्ही राज्यसभा निवडूकीत निवडून आलो. हे ही त्यांनी यावेळी नमुद केले. या निवडणूकीसाठी मतदान होत असताना विरोधी पक्षांने मूद्दाम आमचं एक मत बाद ठरवल्याचं ते यावेळी म्हणाले.

Sanjay Raut
PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; संत तुकाराम शिला मंदिराचे करणार उद्घाटन

तसेच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देहू एका कार्यक्रमात एका व्यासपीठावर असणार आहेत. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, राजशिष्टाचार मुख्यमंत्र्यांनी यापुर्वी ही पाळला आहे. आणि देशाच्या पंतप्रधानांचा सन्मान आम्ही कायम करतो आणि करत राहू असे ही ते यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com