चिपी विमानतळाच्या लोकार्पणावरुन भाजपची पोस्टरबाजी

7 ऑक्टोबरपासून प्रवासी वाहतूक सेवा करण्यासाठी अलाएन्स एअर या विमान वाहतूक कंपनीने तयारी दर्शवली असल्याचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सांगितले आहे.
चिपी विमानतळाच्या लोकार्पणावरुन भाजपची पोस्टरबाजी
Union Minister Narayan RaneDainik Gomantak

गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) उद्धाटनाकरिता अखेर मुहुर्त सापडला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी यासंबंधची माहिती दिली आहे. त्यामुळे आता चिपी विमानतळ प्रवासी उड्डाणास सज्ज झाले आहे. 7 ऑक्टोबरपासून प्रवासी वाहतूक सेवा करण्यासाठी अलाएन्स एअर या विमान वाहतूक कंपनीने तयारी दर्शवली असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचा सिंधुदुर्ग जिल्हा हा बालेकिल्ला असून या ठिकाणी शिवसेनेने शक्ती प्रदर्शनाची भाषा करु नयेत. या ठिकाणी फक्त भाजपच शक्ती प्रदर्शन करु शकते,' म्हणत विशाल परब यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच चिपी विमानतळाचे शिल्पकार आहेत.

Union Minister Narayan Rane
महाराष्ट्र सरकारचं 'मिशन कवच कुंडल',लसीकरणासाठी मोठं पाऊल

दरम्यान, नारायण राणे हवाई उड्डाण मंत्री जोतिरादित्य शिंदे 9 ऑक्टोबरला उद्घाटनादिवशी येणार आहेत. जन आशिर्वाद यात्रेप्रमाणेच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागताचे भव्य दिव्य होर्डिंग विशाल परब यांनी उभारुन भाजपच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com