कल्याणमध्ये बनावट नोटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

25 हजार रुपयांच्या बनावट नोटा केल्या जप्त
कल्याणमध्ये बनावट नोटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Counterfeit NotesDainik Gomantak

राज्यात महागाईचाने उच्चांक गाठला असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील सामान्य माणसाला आपलं अर्थिक गणित सुरळीत करता यावं यासाठी आपल्या दैनंदीन गरजेच्या वस्तू ही वगळतो आहे. असे असतानाच कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने कल्याण पश्चिमेतील एस. टी. आगार परिसरात मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत पोलिसांनी भारतीय चलनातील २५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत तीन तरुणांना अटक केली आहे. (Black money laundering gang busted in Kalyan)

Counterfeit Notes
ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे – पंकजा मुंडे

अटक केलेल्या संशयितांची नावे रजनेश कुमार श्रीदुलारूचंद चौधरी (19, रा. कोळसेवाडी), हर्षद नौशाद खान (19 , रा. पत्रीपूल) आणि अर्जुन राधेश्याम कुशवह (19, रा. कोळसेवाडी) अशी आहेत. भारतीय चलनातील बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस ठाण्याला मिळाली होती. यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

Counterfeit Notes
महाराष्ट्र सरकारला झटका,''OBCआरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार''

मिळालेल्या माहितीनुसार साध्या वेशातील पोलिसांनी एस. टी. आगार परिसरात सापळा रचत रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांवर गस्ती पथकानं पाळत ठेवली.त्यानूसार तीन तरुण संशयास्पदरीत्या हालचाली करताना आढळले. त्यानंतर ते अलगद पोलिसांच्या कचाट्यात सापडले. संबंधित तरुणांकडे चौकशी केली असता, ते 25 हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वटविण्यासाठी आलो होतो, अशी कबुली त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.