मुंबईकरांनो..कोरोना नियमांचे पालन न केल्यास लग्नसोहळ्यात 'गेटक्रॅशिंग'चा BMC चा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

मुंबईतील वाढत्या कोरोना प्रकरणांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने चेतावणी जारी केली आहे की ज्या ठिकाणी सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही अशा विवाहसोहळ्यांमध्ये 'गेटक्रॅश' केले जाईल.

मुंबई : मुंबईतील वाढत्या कोरोना प्रकरणांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने चेतावणी जारी केली आहे की ज्या ठिकाणी सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही अशा विवाहसोहळ्यांमध्ये 'गेटक्रॅश' केले जाईल. म्हणजेच, नियमांचे पालन न करणाऱ्या विवाहसोहळ्यांमध्ये जात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून धडक कारवाई करण्यात येईल. 

मनसुख हिरेन प्रकरण दडपण्याचा राज्य सरकारचा डाव; फडणवीसांचा गंभीर आरोप

आम्हाला भारतीय साग्रसंगीत लग्नपद्धती जेवढी आवडते, तितकीच आम्ही अपेक्षा करतो, कि तुमही सर्व कोरोना नियमांचे पालन कराल. जोडप्याला 'सुरक्षा' ही सर्वात चांगली भेट आहे. आणि तसे झाले नाही, तर आम्हाला निमंत्कण नसताना तिथे येत ऐन लग्नसमारंभात तुमच्यावर धडक कारवाई करावी लागेल, अशा आशयाचं ट्विट बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. 

दहा दिवसांत कोरोना रुग्ण संख्या कमी न झाल्यास मुंबईत कडक लॉकडाउन होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून, परत लॉकडाऊन करावा लागणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे लॉक़डाऊनच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा पुकारण्यात येत आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबईतील सक्रिय कोरोना रूग्णांचे प्रमाण 10,799 इतके आहे.

संबंधित बातम्या