रत्नागिरी बंदरातून 6 मच्छिमारांसह एक बोट गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता

समुद्रात बोट सदृश्य वस्तू कार्गोच्या कॅप्टनला (captain) दिसली होती. मात्र ती नावेद 2 हीच बोट होती, हे माहिती नाही.
रत्नागिरी बंदरातून 6 मच्छिमारांसह एक बोट गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता
गायब झालेल्या जहाजाचा शोध घेताना पोलीस Dainik gomantak

गुहागर: रत्नागिरीतील (Ratnagiri) जयगड बंदरातून नावेद 2 ही बोट 7 खलाशांसह मासेमारीसाठी गेली असता ती अचानक गायब झाली मागील एक महिन्यापासून या बोटीचा आणि त्यावरील खलाश्यांचा शोध सुरु आहे. अद्याप या 6 मच्छिमारांसह बोट बेपत्ताच असून, त्यामागील नेमके काय कारण आहे, ती बोट आणि मच्छिमार (Fisherman) यांचे काय झाले हे आद्याप समोर आलेले नाही. यामुळे जिल्ह्यातील सर्व मच्छिमार चिंतेत आहेत. दुसरीकडे बेपत्ता झालेल्या खलाशांच्या कुटुंबीयांनी ते परत येतील ही अपेक्षा सोडून दिली असून, त्यांचा अंत्यविधीही केला आहे.

नावेद 2 या बोटीला जिंदाल कंपनीची (Jindal Company) मालवाहू जहाज धडकली आहे असा संशय मच्छिमारांसह स्थानिक आमदार (MLA) भास्कर जाधव आणि माजी आमदार विनय नातू यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार आता याची सर्व चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री(CM) उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. या घटनेला एक महिना होऊन गेला तरीही बेपत्ता बोटीचा काहीच पत्ता नाही. यामुळे तपास यंत्रणेविषयी संशय तयार होत आहेत. मच्छिमारांनी सांगितले की बोटीला जर अपघात झाला असेल तर बोटीचे अवशेष तरी मिळणं अपेक्षित होतं. अगदीच काही नाही तर, बोटीवरचं काही सामान असं असतं जे पाण्यात बुडणारं नसतं. त्यामुळे ते तरी दिसायला पाहिजे.

गायब झालेल्या जहाजाचा शोध घेताना पोलीस
दापोली न.पं.ची निवडणूक जाहीर झाली

मात्र यापैकी काहीच सापडले नाही. ना अवषेश ना काही मग घातपात तर नाही झाला नाही ना? अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. जर हा घातपात असेल तर केवळ मच्छिमारच नाही तर देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. असे स्थानिक मच्छिमारांनी म्हटले आहे. याबाबत बोट मालक नासीर संसारे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या नंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणाची चौकशी केली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी जिंदाल मधून 26 ऑक्टोबरला गेलेल्या मालवाहू जहाजाच्या कॅप्टनबद्दल चौकशी केली आहे. घटनेच्या दिवशी बोट सदृश्य काहीतरी दिसलं होत अशी कबुली कार्गोच्या कॅप्टनने दिली. असे पोलिसांनी माहिती मिळाली.अजून तरी बाकीची माहिती समोर आली नाही.

या बेपत्ता नावामुळे जवळपास 7 जणांचे परिवार उध्वस्त झाले आहेत. यामध्ये दगडू तांडेल हे देखील आहे आणि यांच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्या घरी पत्नी, 4 अविवाहित मुली, कॅन्सरग्रस्त विवाहित मुलगा त्याची पत्नी आणि त्यांचे 11 महिन्याचे बाळ. असा परिवार आहे. आता सर्वजण पोरके झाले आहेत.

कंपनीचे PRO आणि पोर्टवरील सिक्युरिटीच्या (security) यांनी संगितले की, समुद्रात बोट सदृश्य वस्तू कार्गोच्या कॅप्टनला दिसली होती. मात्र ती नावेद 2 हीच बोट होती, हे माहिती नाही. त्यामुळे याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या बैठकीत खलाशांच्या वारसांना जिंदाल कंपनीच्या CSR मधून मदत करण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु कंपनीने यावर अधिकृत भाष्य केलेले नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com