बंधपत्रित डॉक्‍टर्सच्या मानधनात मोठी वाढ

doctor
doctor

मुंबई

बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्‍टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्‍टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. कोरोना लढाईला यामुळे निश्‍चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्‍टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्‍टर्सना 60 हजारांच्या ऐवजी 75 हजार आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्‍टर्सना 70 हजार ऐवजी 85 हजार
इतर भागातील एमबीबीएस डॉक्‍टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार इतर भागातील विशेषज्ञ डॉक्‍टर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रुपये मानधन देण्यात येईल.

डॉक्‍टर मानधन
आदिवासी भागातील बंधपत्रीत 60 हजारांऐवजी 75 हजार
आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ 70 हजारांऐवजी 85 हजार
इतर भागातील एमबीबीएस 55 हजारांऐवजी 70 हजार
इतर भागातील विशेषज्ञ 65 हजारांऐवजी 80 हजार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com