सकाळ प्रकाशनतर्फे सासवडमध्ये ‘ग्रंथोत्सव’ प्रदर्शन-विक्री उपक्रम

दैनिक गोमन्तक
सोमवार, 14 डिसेंबर 2020

  सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ प्रकाशन विभागातर्फे ‘ग्रंथोत्सव’उपक्रमाचे उद्‌घाटन सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांच्या उपस्थितीत झाले. हे पुस्तक प्रदर्शन सासवड पालिकेच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात रविवारपासून बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे.

सासवड :  सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ प्रकाशन विभागातर्फे ‘ग्रंथोत्सव’उपक्रमाचे उद्‌घाटन सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी नंदकुमार सागर, साहित्य परिषदेचे चिटणीस शिवाजी घोगरे, ग्रंथपाल तानाजी सातव, ग्राम विकास अधिकारी अविनाश निगडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब पायगुडे, पाणी पंचायतीचे प्रशांत बोरावके, नरेंद्र झगडे यांच्या उपस्थितीत झाले. हे पुस्तक प्रदर्शन सासवड पालिकेच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात रविवारपासून बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे.

"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कऱ्हेकाठी सासवड नगरीत संपन्न केले. त्यातून येथे विस्तारलेली साहित्य, वाचन चळवळ सकाळ प्रकाशनच्या पुस्तक प्रदर्शन व विक्री उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देईल."
- विजय कोलते, अध्यक्ष, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान

सकाळ प्रकाशनची विविध प्रकारची सर्व पुस्तके २५ टक्के सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १२०० रुपयांच्या खरेदीवर ४० टक्के सवलत व १५०० रुपयांच्या खरेदीवर सवलतीसह जादा एक पुस्तक भेट. अशी पुरंदर तालुका व परिसरातील वाचकांसाठी ऑफर आहे, असे आशुतोष रामगीर यांनी जाहीर केले. प्रदर्शन १६ डिसेंबरपर्यंत रोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहील. कार्यक्रमात प्रास्ताविक सागर यांनी केले. आभार मुळीक यांनी मानले. संयोजन स्थानिक बातमीदार श्रीकृष्ण नेवसे यांनी केले. निवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब मुळीक, सुनील जगताप, शांताराम कोलते, प्रार्थना निगडे, विजय कुलकर्णी, राहुल जाधव, दत्ता भोंगळे, रामदास जगताप आदी उपस्थित होते.  

"सकाळ प्रकाशनने विविध विषयांवरील वाचनीय पुस्तके पाहण्याची व खरेदी करण्याची सासवडमध्ये मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नगरपालिकेने वाचन चळवळीस प्रोत्साहन म्हणून उपक्रमास जागा उपलब्ध करून सहकार्य केले. नागरिकांनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा."
- मार्तंड भोंडे, नगराध्यक्ष सासवड

संबंधित बातम्या