मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाड दौऱ्यावर, तळियेला देणार भेट
Chief Minister Uddhav Thackeray will pay a visit to Taliye on Mahad tourDainik Gomantak

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाड दौऱ्यावर, तळियेला देणार भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने पूरग्रस्त महाडला रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून(Mumbai) हेलिकॉप्टरने पूरग्रस्त(Floods) महाडला रवाना होणार आहेत. ते आपल्या भेटीदरम्यान पूरग्रस्त तळिये गावालाही भेट देतील.(Heavy Rain In Maharashtra)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत आहेत. महाड(Mahad) येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी 1.30 वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी 3.20 वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून मिळाली आहे.(Raigad)

रायगड जिल्ह्यातील तळीये गावात गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून 35 घरे दबली गेली होती . दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा,अशी मागणीही स्थानिकांकडून होत आहे.


Chief Minister Uddhav Thackeray will pay a visit to Taliye on Mahad tour
महाराष्ट्रावर आभाळ फाटलं, 129 जणांचा मृत्यू

दरम्यान मागील 48 तासांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे, संपूर्ण राज्यभर कोसळत असणाऱ्या पावसाने अर्ध्या राज्याला जायबंदी केले आहे. कुठे पूर, कुठे खचलेला रस्ता तर कुठे कोसळलेली दरड या सगळ्या घटनांनी राज्यात मागील 48 तासात राज्यात आतापर्यंत एकूण 129 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्यसरकारनेही कालच दरड कोसळल्यामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com