मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बस दरीत कोसळली ; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एक बस ५० फुट दरीत कोसळली. ही बस मुंबईच्या सायन मधून कणकवलीकडे जात होती. 

खेड :  मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एक बस ५० फुट दरीत कोसळली. ही बस मुंबईच्या सायन मधून कणकवलीकडे जात होती. अपघातग्रस्त बस ही चिंतामणी नावाची आराम बस आहे. हा अपघात आज पहाटे ४  वाजता रायगडच्या हद्दीत येणाऱ्या भोगावजवळ  कशेडी घटादरम्यान घडला. या अपघातामध्ये एका सात वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला, तर एक वृद्ध अजून गाडीत अडकून आहे.

बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते. त्यापैकी २५ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मदत कार्य  अजूनही जोरदार सुरू आहे. बहुतेक प्रवासी संगमेश्वर येथील रहिवासी आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी मदतीला दाखल झाल्या आहेत. २५ जखमी प्रवाशांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक वाचा :

महाराष्ट्र सरकारने 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले लॉकडाउन नविन नियमांची यादी जाहीर

 

संबंधित बातम्या