मुंबईहुन सुटणार गोव्यासाठी गाडी

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

मुंबई-गोवा बस चालविणाऱ्या बस सेवांच्या नवीन वर्षाच्या दोन आठवड्यांपर्यंत बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.

मुंबई: रात्री अकरा ते पहाटे सहाच्या दरम्यान कर्फ्यू असताना लोक ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाठी मुंबईच्या बाहेर ठिकाणी जायला लागले आहेत . ट्रॅव्हल एजंट्स , बस ऑपरेटर आणि अगदी मुंबई-गोवा बस चालविणाऱ्या बस सेवांच्या नवीन वर्षाच्या दोन आठवड्यांपर्यंत बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या यादीमध्ये सुरवातीला गोवा बूकींग ची अधिकाधिक मागणी होत आहे. जिथे या काळात लोकांसाठी कुटुंबीयांसह मुक्काम करण्यासाठी सोय उपलब्ध होते अशा दमण, सिल्वासा, लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वर ठिकाणी बूकींग जास्त प्रमाणात होत आहे. त्यापैकी काहींनी नवीन वर्षात मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला आहे.
 

बस आणि कार ऑपरेटर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी समिती सदस्य हर्ष कोटक यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत गोवा, दमण आणि इतर ठिकाणी खासगी बसच्या बुकिंगमध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. “कोविड महिन्यांनंतर जेव्हा व्यवसाय कमी होता तेव्हा जवळपास २०% खाजगी टूरिस्ट बसेस रस्त्यावर आल्या आणि व्यवसाय करत होत्या. या वर्षाच्या शेवटच्या दोन आठवड्यांत 65% बसेस प्रवाशांना घेऊन जातील कारण मुंबईबाहेरील पर्यटनस्थळांना जाण्यासाठी मोठी मागणी आहे.

सोबतच खासगी कॅब सुध्दा बुक केली जात आहे तर काही लोक स्वत: ची वाहनेही घेवूनही या पर्यटनस्थळांना भेट देत आहे. अशी माहिती ट्रॅव्हल एजंट्सने दिली.

इनटाइम टूर्समधील कमलेश ठक्कर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून खासगी कॅब बुकिंगमध्ये वाढ झाली असून ग्राहकांनी परिवारासह 3 ते 4 दिवसासाठी कॉब बूकींग करणे पसंत केले. कारण त्यांना तो प्रवास करणे सुरक्षित वाटतो.

 

संबंधित बातम्या