महाराष्ट्रातील व्यापारी वर्गांची आर्थिक मदतीसाठी पंतप्रधानांकडे धाव

PM Narendra Modi
PM Narendra Modi

मुंबई - कोरोना संसर्गामुळे (Corona virus) अनेक राज्यातील व्यापारी वर्ग (merchant class) आर्थिक अडचणीत (Financial difficulties) सापडले आहेत. यामुळे त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मदतीसाठी हाक दिली आहे. या व्यापरांनी ट्रेडर्स ऑफ युनायटेड फ्रंटची (Traders of the United Front) स्थापना केली आहे. त्याच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात व्यापारी वर्गांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आर्थिक मदत करण्याची मागणी (Demand) केली आहे. (The business community in Maharashtra rushed to the Prime Minister for financial help)

कोरोना काळात ज्या व्यापाऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांचे 50 टक्के व्याज माफ करावे. तसेच 50 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना  तीन महिन्याचे व्याज माफ करावे. लघु  उद्योजकांना एसएमई युनिट जारी करून व्यापाऱ्यांना जीएसटीचा परतावा द्यावा, अशा मागण्या या पत्रातून केले आहेत. असे एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांनी सांगितले आहे. 

मुंबईमधील व्यापारी ठाकरे सरकारवर नाराज आहेत . कारण शहरातील कोरोना संसर्ग  आटोक्यात येऊन बरेच दिवस झाले असून निर्बंध शिथील झाले नाही. 'ब्रेक द चेन' च्या नियमावलीत मुंबई शहराचा समावेश लगेच दुसऱ्या स्तरात करावा. यामुळे व्यापाऱ्यांना अधिक मोकळीक मिळेल, असे वक्तव्य एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांनी सांगितले आहे. 

मुंबई शहरातील कोरोना परिस्थिती ही नियंत्रणात आहे. तरीसुद्धा शहरात करोनाच्या तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध का लागू केले आहेत. असा प्रश्न विरेन शाह यांनी विचारला. नवी मुंबई आणि ठाण्यातील व्यापारी वर्गावरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहे. परंतु , मुंबईतील व्यापारी वर्गाचे निर्बंधामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदारांचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे, असेही विरेन शाह यांनी सांगितले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com