वाढीव वीज बिलांवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं..

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊल दरम्यान आलेल्या वाढिव वीज बिलांवर सवलत देण्यास नकार दिल्याने महाराष्ट्राचं राजकारण वीज बिलांच्या मुद्दयावरून तापण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

मुंबई :  महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊल दरम्यान आलेल्या वाढिव वीज बिलांवर सवलत देण्यास नकार दिल्याने महाराष्ट्राचं राजकारण वीज बिलांच्या मुद्दयावरून तापण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलांवर सवलत मिळू शकणार नाही, पूर्ण वीजबिल भरावे लागणार असल्याचे वक्तव्य करताच राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी तोपर्यंत नागरिकांनी वीजबिल न भरण्याची विनंती पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे.
एप्रिल महिन्यापासून नागरिकांना वाढीव दराने वीजबिले येत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेकांना वीज बिल भरणे शक्य झाले नाही. उर्जामंत्री राऊत यांनी सवलती देण्यास नकार दिल्याने मनसे सदस्य आक्रमक झाले. “वीज बिलाबाबत सर्व निवेदने, अनुप्रयोग, बैठक, विनंत्या पूर्ण झाल्या आहेत. पण सरकार प्रतिसाद देत नाही. लोकांना दिलासा देण्यासाठी आम्ही रस्त्यावर आंदोलन करू”, असं ते म्हणाले. मनसेने आंदालनाचा इशारा दिला असतानाच, आता भाजपही सोमवारी वाढीव वीज बिलांवर सवलत देण्यात यावी या मागणीकरिता आंदोलन करणार आहे.

एकीकडे हे दोन्ही पक्ष वीज बिलांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत आसताना, फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे वीज बिलांवर सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचे म्हणले जात आहे.

अधिक वाचा : 

राज्यसरकार शेतकर्यांना देणार दरवर्षी एक लाख कृषी पंप

संबंधित बातम्या