Maharashtra Cabinet: महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, मुख्यमंत्री शिंदेंचे वक्तव्य

Ekanth Shinde & Devendra Fadnavis
Ekanth Shinde & Devendra FadnavisDainik Gomantak

निलबंनाची टांगती तलवार आणि निवडणूक आयोगसमोरील पेच अशा दुहेरी संकटात महाराष्ट्रातील शिंदे सरकार सापडले आहे. नवीन सरकारचा शपथविधी होऊन एक महिना उलटून गेला आहे. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्तार कधी होणार हा प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला प्रश्न पडला आहे. अशात महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकरच होईल. यासाठी पुढचा आठवडा वाट पहावी लागणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) यांनी केलं आहे.

भाजप नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) कालपासून दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज (शनिवारी) दुपारी नवी दिल्लीत पोहोचले आहेत. दोन्ही नेते दिल्लीत असतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP President JP Nadda) यांना भेटण्याची शक्यता आहे. या बैठकीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम चर्चा होईल अशी राजकिय वर्तुळात चर्चा आहे. अनेक दिवसांपासून खोळंबलेला मंत्रीमंडळ विस्ताराचा तिडा आज सुटला जाईल असा एकंदर या चर्चेचा सूर आहे. भाजप आणि शिंदे गटातील अनेक दिग्गज नेते मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत.

Ekanth Shinde & Devendra Fadnavis
महाराष्ट्रात Cabinet विस्तार का होत नाही? शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितले खरे कारण

नवी दिल्लीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल दाखल होत आहेत. आज दुपारी साडे चार वाजता पंतप्रधानांच्या (Prime Minister) उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक राष्ट्रपती भवनात (Rastrapati Bhavan) होणार आहे. तसेच उद्या नीती आयोगाची (Niti Aayog) देखील बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीसांसह महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) हे या बैठकीला हजर राहतील.

महाराष्ट्रात शिंदे-भाजप सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती (Flood) आहे. असंख्य विकासकामं प्रलंबित आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून टीका होत आहे.

Ekanth Shinde & Devendra Fadnavis
राज्यातील अभयारण्य विकसित करणार; विश्वजीत राणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com