Video: मुंबई गोवा हायवेवर मोठा अपघात; पंक्चर शिवशाहीला धडकली कार, प्रसिद्ध निवेदकाचा जागीच मृत्यू

पंक्चर झाल्याने रस्त्याकडेला थांबलेल्या शिवशाही बसला कार जोरात धडकल्याने हा अपघात झाला.
Mumbai Goa Accident
Mumbai Goa AccidentDainik Gomantak

मुंबई - गोवा महामार्गाचे काम मागील बारा वर्षांपासून रखडले असून, हायवेवर अपघाताचे सत्र थांबता थांबेना. दरम्यान, या मार्गावर पनवेल जवळ झालेल्या अपघातात प्रसिद्ध निवेदकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पंक्चर झाल्याने रस्त्याकडेला थांबलेल्या शिवशाही बसला कार जोरात धडकल्याने हा अपघात झाला.

ठाणे येथील इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश मोरे महाड येथील कार्यक्रम आटपून आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते. पनवेल येथील चिंचवण गावाजवळ उभ्या असलेल्या शिवशाही बसला भरधाव येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात गाडीतील दीपेश मोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण जखमी झाले आहेत. चिंचवण गावाच्या हद्दीत शिवशाही बसचा टायर पंक्चर झाल्याने ती रस्त्यावर उभी होती.

Mumbai Goa Accident
Colva: गेस्ट हाऊसमध्ये चालवायचे सेक्स रॅकेट; पती-पत्नीसह महाराष्ट्रातील एकाला अटक

अपघात झाल्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात कारने थांबलेल्या शिवशाहीला पाठीमागून धडक दिल्याचे दिसत आहे. यात कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसत आहे.

Mumbai Goa Accident
Heat Wave In Goa: शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

मोरे अर्टिगा गाडी क्र एमएच 04 जीएम 2495 ही घेऊन चालले होते. गाडीचा अंदाज न आल्याने अर्टिगा गाडी चालकाने शिवशाही बसला पाठीमागून धडक दिली. मोरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या सहकारी रश्मी खावणेकर आणि श्रद्धा जाधव व कोमल माने या किरकोळ जखमी झाल्या आहेत. जखमी झाल्याने त्यांना लाईफलाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com