मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ, याप्रकरणी CBI ने केली अटक

Sanjay Pandey Arrested: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.
Sanjay Pandey
Sanjay PandeyDainik Gomantak

CBI Arrested Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. यापूर्वी त्यांना ईडीने अटक केली होती. ते आता न्यायालयीन कोठडीत होते. संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती. आता याच प्रकरणात सीबीआयने माजी पोलीस आयुक्तांनाही अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सीईओ आणि माजी संचालक रवी नारायण यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली

दिल्लीतील एका न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआयकडे (CBI) तपास सुरु ठेवण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 14 जुलै रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि मुंबईचे (Mumbai) पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर पीएमएल अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयने यापूर्वी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Sanjay Pandey
Former Police Commissioner: माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

संजय पांडे यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत होता

अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात मंगळवारी संजय पांडे यांना 16 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. याच प्रकरणात गुरुवारी दिल्ली न्यायालयाने संजय पांडेंना जामीन नाकारला होता. विशेष न्यायाधीश सुनेना शर्मा यांनी पांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

याप्रकरणी सीबीआयने छापा टाकला

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार तपास यंत्रणेने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याआधी सीबीआयने मुंबईतील सीबीआय मुख्यालयात पांडे यांचा जबाब नोंदवला होता. चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. यानंतर सीबीआयने या प्रकरणासंदर्भात मुंबई, पुणे आणि देशातील अनेक ठिकाणी छापे टाकले.

Sanjay Pandey
Mumbai: नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांना दिलं मोठं गिफ्ट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय पांडे यांनी 2001 मध्ये पोलिस सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यानंतर त्यांनी आयटी कंपनी सुरु केली. परंतु, काही काळानंतर ते पुन्हा पोलिस सेवेत रुजू झाले. त्याच वेळी त्यांचा मुलगा कंपनीचा संचालक बनवला. 2010 ते 2015 दरम्यान, Isaac Services Pvt Ltd ला NSE सर्व्हर आणि सिस्टम सिक्युरिटीसाठी कंत्राट देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com