सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची सगल तिसऱ्या दिवशी चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

‘सीबीआय’ने रियाची शुक्रवारी १० तास, तर शनिवारी सात तास चौकशी केली. आज तिची नऊ तास चौकशी झाली. अमली पदर्थ घेण्यापासून सुशांतला थांबवले का नाही, असा प्रश्‍न तिला विचारल्याचे समजते.

मुंबई: सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज पुन्हा अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी ‘सीबीआय’ने रियाला सगल तिसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले होते. 

‘सीबीआय’ने रियाची शुक्रवारी १० तास, तर शनिवारी सात तास चौकशी केली. आज तिची नऊ तास चौकशी झाली. अमली पदर्थ घेण्यापासून सुशांतला थांबवले का नाही, असा प्रश्‍न तिला विचारल्याचे समजते. सीबीआयने सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग यांचीही चौकशी केली आहे.

खात्यातून मोठे व्यवहार
गेल्या पाच वर्षांमध्ये सुशांतच्या बॅंक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत. स्वतःवर, मित्रांवर, कुटुंब आणि घरातील नोकरावरही सुशांत अगदी सहज आणि हवे तसे पैसे खर्च करत होता, असे ऑडिटमधून दिसून आले आहे. मुंबई पोलिसांनी सुशांतसिंहच्या बॅंक खात्याचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट केला होता. त्याचप्रमाणे कंपनीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये समोर आले की, सुशांतच्या खात्यामधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इलेक्‍ट्रॉनिक व्यवहार झाले नाही. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या