प्रभू रामचंद्रांना मानणाऱ्या केंद्र सरकारला वचनबद्धतेचा पडला विसर

दैनिक गोमन्तक
शनिवार, 26 डिसेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार प्रभू रामचंद्रांना मानते; परंतु रामाच्या वचनबद्धतेचा केंद्र सरकारला विसर पडला आहे. असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला.

राळेगणसिद्धी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार प्रभू रामचंद्रांना मानते; परंतु रामाच्या वचनबद्धतेचा केंद्र सरकारला विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दोनदा उपोषण केले. त्यावेळी पंतप्रधान कार्यालय व तत्कालीन कृषिमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले. ते एकप्रकारे वचनच आहे; पण केंद्र सरकारने ते पाळले नसल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला.

आणखी महिनाभर वाट पाहिल, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्लीतील रामलीला किंवा जंतरमंतरवर शेतकऱ्यांसाठी शेवटचे उपोषण करू. आंदोलनासाठी मैदान उपलब्ध झाले नाही, तर अटक करून घेऊन प्रसंगी तुरूंगातून उपोषण करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला.

हजारे म्हणाले, की २०१८पासून केलेला पत्रव्यवहार, २०१८ व २०१९च्या उपोषणादरम्यान पंतप्रधान कार्यालय व तत्कालीन कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी लेखी आश्वासने दिली होती. या बाबी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या कानावर घातल्या. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ते दिल्लीतील सरकारशी बोलणार असल्याचे म्हणाले आहेत.

आणखी वाचा:

एलआयसीचे पूर्ण खासगीकरण होणार नाही -

संबंधित बातम्या