धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मुंबई: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेवर बलात्काराचे आरोप केले होते.महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडेंच्या संबंधाच्या चर्चा रंगल्या.मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता लवकरात लवकर राजीनामा त्यांनी द्यावा.

भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेने एक पत्रक प्रसिध्द करुन मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.ज्या व्यक्तीवर बलात्कारासारखे गंभीर आरोप होतात त्याला पदावर राहण्याचा काही एक नैतिक अधिकार नाही. मात्र गेंड्याच्या कातडीचे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार आत्मपरिक्षण करुन मुंडेचा राजीनामा घेतील असं काही वाटत नाही.तरीही मुंडेंनी राजीनामा द्यावा.

संबंधित बातम्या