महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाची शक्यता: हवामान विभाग

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra Rains
Maharashtra RainsDainik Gomantak

बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवड्यामध्ये 19 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.

Maharashtra Rains
Unlock Mumbai: मुंबईकरांसाठी चौपाट्या, उद्याने रात्री 10 पर्यंत खुली

मुंबईत मुसळधार पाऊसाचा अंदाज

येत्या तीन दिवसांमध्ये मुबंईमध्ये मुसळधार पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या हलका आणि मध्यम स्वरुपाचा मुंबईत पाऊस पडणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. 18 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढेल, असंही सांगण्यात येत आहे.

Maharashtra Rains
कोकण रेल्वे मार्गावरील गणपती विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुरू

नेमकी विदर्भात स्थिती काय?

नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून आज विदर्भामधील काही ठिकाणी विजांच्या कडाकडाटासह मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविली आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. 18 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये कमाल आणि किमान तापमान पाहायला मिळत आहे.

Maharashtra Rains
कोकण-रेल्वे मार्गावरील वाहतुक 6 तासांत पुन्हा सुरु

कोकणात पाऊसाचा अंदाज?

कोकणमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाद्वारे वर्तविण्यात आला आहे. कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्टही देण्यात आला आहे. तर दुसरीकडे सिंदुदुर्गात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यताही वर्तविली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com