''चंद्रकांत दादांना मस्ती आली आहे''; हसन मुश्रीफ संतापले

''चंद्रकांत दादांना मस्ती आली आहे''; हसन मुश्रीफ संतापले
mushrif.jpg

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना राज्यातील राजकारणही कोरोनाच्या गतीने बदलत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी ''चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) जास्त मस्ती आली आहे'' असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपवर टीका करताना तोंड संभाळून बोलावे, नाहीतर आम्हीही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला चांगलंच महागात पडेल, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. त्यावर प्रतिक्रीया देत हसन मुश्रीफ यांनी आपलं हसू होऊ नये यासाठी चंद्रकांत दादांनी अशी वक्तव्य करणं टाळावीत असा सल्ला दिला आहे. ते कोल्हापुरमध्ये (Kolhapur) माध्यमांशी बोलत होते. (Chandrakant Dada is having fun Hassan Mushrif got angry)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांनी पंढरपूर- मंगळवेढा निकालावेळी तुम्ही जामिनावर सुटला आहात, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकावर तुम्ही बोलू नका, अशी तंबी दिली होती. दोन दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांची औकात काय असही म्हटलं होतं. त्यांना हे शोभत नाही. नुकतचं त्यांचं कार्टुन आलं आहे ज्यामध्ये ते बेडवर पडलेत आणि झोपेतच म्हणत सरकार पडल्याचं म्हणत आहेत. आपलं हसू होऊ देवू नका यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशी वक्तव्य टाळावीत'', असा सल्ला मुश्रीफ यांनी दिला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com