“टरबुजाने बंडखोर आमदारांवर 7 हजार कोटी खर्च केले''

हा रिक्षावाला माणूस इतका मोठा कसा होतो ? एवढे पैसे कोठून आले ?
Chandrakant Khaire
Chandrakant KhaireDainik Gomantak

शिवसेनेची अंतर्गत बंडाळी आता शिगेला पोहोचली आहे. शिंदे गट ठाकरे गटावर ना - ना प्रकारचे आरोप करत आपण का बंड केले याचं समर्थन करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांना जिवंत मुडदे असे म्हणत बंडखोरांनी केलेल्या बंडावर खरपूस टीकास्त्र सोडले आहे. असे असताना शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरै यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना गंभीर आरोप केले आहेत. ( chandrakant khaire allege 7 thousand crore rupees expense for rebel in shivsena )

Chandrakant Khaire
Maharashtra: बंडखोर आमदार गुवाहाटीत इनडोअर गेम्समध्ये मशगुल

गंभीर आरोप करताना खैरे यांनी शेलक्या शब्दात बंडोखोर आमदारांवर टीकास्त्र ही सोडले आहे. ते म्हणाले की, गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना 7000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच हा खर्च टरबुजाने केला की कुणी केला? असा सवाल उपस्थित शिवसैनिकांना केला. यावर शिवसैनिकांनी टरबुजाने केला असं उत्तर दिलं. यावर खैरेंनी टरबुजाने खर्च केला असा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक तुम्हाला याबाबत सांगतील, असं म्हटलं.

Chandrakant Khaire
Maharashtra: 'ठाकरे पिता-पुत्र अन् संजय राऊतांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा'

खैरे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, आनंद दिघे यांनी गद्दारांना क्षमा नाही असं म्हटलं आहे. आणि एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. त्यामूळे हे आनंद दिघेंचे शिवसैनिक नाहीत, हे नकली शिवसैनिक आहेत. आनंद दिघेंनी त्यांना रिक्षा चालवताना नगरसेवक केलं, पण ते आनंद दिघेंना विसरले. हा रिक्षावाला माणूस इतका मोठा कसा होतो ? एवढे पैसे कोठून आले ? कोट्यावधी रुपये छापलेत. असा प्रश्न ही त्यांनी यावेळी केला.

चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले, “आपण मजबुतीने उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहू. त्यांनी सांगितलं होतं की मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. मात्र, शरद पवार यांनी दुसरं कुणी चालणार नाही असं सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यावेळी त्या दाढीचा चेहरा होता. मात्र, शरद पवारांनी सांगितलं की हे कालचं पोरगं कुठं मुख्यमंत्री करायचं. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना ते मुख्यमंत्री झाले तरच सरकार चालेल असं सांगितलं. अडीच वर्षे सरकार व्यवस्थित चाललं.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com