गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटलांची वर्णी

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 मे 2021

बंद लिफाफ्यातून आलेल्या व्यक्तीच्या नावाचे वाचन करण्यात आले.

राज्यामधील सर्वात मोठ्या गोकुळ दूध (Gokul Dudh) संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनेक राजकीय घडामोडीनंतर पुन्हा एकदा विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्या हाती आली आहे. नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाचा नवा अध्यक्ष कोण होणार? याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विश्वास पाटील, अरुण डोंगळे हे माजी अध्यक्ष अध्यक्षपदाच्या स्पर्धेत होते. अध्यक्षपदाची पहिली संधी कोणाला द्यायची? यावरुन पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यात प्रदिर्घ चर्चा झाल्यानंतरही एकमत होत नव्हते. आज मात्र चर्चेचे आणखी एक आवर्तन झाले होते. बंद लिफाफ्यातून आलेल्या व्यक्तीच्या नावाचे वाचन करण्यात आले. त्यामध्ये मे 2023 पर्यंत त्यांचा कालावधी असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर अध्यक्षपदाची माळ अखेर विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडली. (Character of Vishwas Patil as the President of Gokul Dudh Sangh)

"निवडणूका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात"; हे काय नियोजन आहे का?

यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, ‘’गोकुळच्या दमदार, गुणात्मक वाटचालीसाठी राजकारण बाजूला ठेवून विरोधकांसह सर्वांनाच काराभारात सामावून घेतले जाईल. दूध उत्पादकांना प्रती लिटर दोन रुपयांची वाढ, वासाच्या दूधाचा प्रश्न, जादा परतावा यासह अन्य आश्वासनांची पूर्तता केली जाईल. निवडणूकीपूर्वी दूध उत्पादकांना देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करु.’’ 

गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणणारे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांचा आज विश्वास पाटील यांच्यासह संचालकांनी आवर्जून उल्लेख केला. 
 

संबंधित बातम्या