सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक: खासदार छत्रपती संभाजी राजे

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मराठा समाजाच्या अन्य प्रश्नावरून सरकार (Maharashtra Government)मराठा समाजाची फसवणूक करीत आहे
सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक: खासदार छत्रपती संभाजी राजे
Chatrapati Sambhaji Raje: Maharashtra Government not serious about Maratha ReservationDainik Gomantak

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मराठा समाजाच्या अन्य प्रश्नावरून सरकार (Maharashtra Government)मराठा समाजाची फसवणूक करीत आहे.असा थेट आरोप खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी राज्य सरकारवर केला आहे. राज्य सरकारने जे पत्र पाठवले आहे ते पात्र अधिकाऱ्यांनी लिहिले असून मुख्यमंत्र्यानी (Chief Minister) देखील या प्रश्नांची याची पुरेशी दखल घेतलेली नाही.अशी खंत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे समाजाने शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाची सरकार दखल घेणार नसेल तर पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.(Chatrapati Sambhaji Raje: Maharashtra Government not serious about Maratha Reservation)

Chatrapati Sambhaji Raje: Maharashtra Government not serious about Maratha Reservation
महाराष्ट्राचा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास पुन्हा विरोध का?

प्रशासनातील अनेक अधिकारी या सगळ्या बाबतीत अधिकारी मुख्यमंत्री आणि सरकारला अंधारात ठेवत आहेत. त्याचबरोबर मराठा समजाचे अनेक प्रश्न आम्ही लावून धरले होते त्यातीलच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सारथी मात्र सरकार सारथीला पुरेसा निधी देत नाही असा गंभीर आरोपही संभाजी राजे यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती रक्त पत्राद्वारे संभाजीराजे यांना दिली होती.

मुख्यमंत्र्यांच्या पत्राने सरकारकडून मराठा समाजाच्या आंदोलनाकडे होणारे दुर्लक्ष समजत असून हे सारे पाहून मी आता कंटाळलो आहे. मात्र आपल्या राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावंत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाज आणि समन्वयक यांना वेठीस धरण्याऐवजी समाजाने परवानगी दिल्यास मी एकटाच आझाद मैदानात आंदोलनास बसायला तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रातील एकूण १५ मुद्दय़ांमध्ये ज्या निर्णयांबाबत माहिती दिली आहे,त्या सगळ्या सूचनांनी आपण समाधानी नाही असेहि सांगत संभाजी राजेंनी संताप देखील व्यक्त केला आहे .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com