दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात : रावसाहेब दानवे

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

दिल्लीत शेतकर्‍यांकडून होत असलेल्या निषेधामा चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

औरंगाबाद - दिल्लीत शेतकर्‍यांकडून होत असलेल्या निषेधामा चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. जालन्याचे खासदार असलेले दानवे हे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तहसील टाकळी या गावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनासाठी गेले होते. दानवे यांनी गावात एका मेळाव्याला संबोधित करताना हे विधान केलं. दानवे म्हणाले , केंद्र सरकार गरीबांना धान्य खरेदी करण्यासाठी किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) 1.75 लाख कोटी रुपयांचे अनुदान देते, जेणेकरुन गरीबांना दोन रुपये किलोने गहू आणि तीन रूपये किलो तांदूळ मिळेल.

 

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार आपल्या तिजोरीतून पैसे खर्च करण्यास तयार आहे परंतु चालू आंदोलन हे शेतकर्‍यांचे आंदोलन नाही तर या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असे ते म्हणाले. यावर बाहेरील देश आपल्या देशात लुडबूड करत आहेत याचाच अर्थ पंतप्रधान त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले आहेत असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले.

संबंधित बातम्या