'दाऊद जर म्हणाला भाजपमध्ये येतोय तर...', मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकर आणि हिंदुत्वा भोवती फेर धरत आहे.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackerayDainik Gomantak

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून लाऊडस्पीकर आणि हिंदुत्वा भोवती फेर धरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करत राज्यासह देशातील राजकारण्यांना भांडणासाठी नवा मुद्दा दिला. यातच आता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज महासभा घेत शिवसेना कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील जनतेला नवा संदेश दिला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना भाजपवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, ''छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवाद अभिवादन करतो. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलणारे आज सर्वच आहेत. खोट्या हिंदुत्वाचा बुरखा पांघारलेला भाजप (BJP) सध्या आपल्या सोयीनुसार नव्या हिंदुत्वाची आखणी करत आहे. आमचं हिंदुत्व अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व आहे.''

CM Uddhav Thackeray
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत दिवाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार

मुख्यमंत्री म्हणाले, ''संपूर्ण देशातच नव्हे तर जगात हिंदुत्वाचा रक्षक म्हणून भाजप स्व:तला प्रोजेक्ट करत आहे. कुणाचीच हिम्मत नाही की आमच्या हिंदुत्वावर घाला घालण्याची. काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की, 'आम्ही लवकरच मुंबईला स्वतंत्र करणार आहोत.' मात्र मुंबईला कोणीच महाराष्ट्रापासून वेगळं करु शकत नाही. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सहभाग घेतला नव्हता. हिंदुत्व आमचा श्वास आणि मराठी आमचा प्राण आहे. मात्र महागाईवर कोणीच बोलत नाही. देशात मोठ्याप्रमाणात महागाईचा भडका उडाला आहे. मात्र त्याकडे मोदी सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत.''

मुख्यमंत्री म्हणाले, 'मुंबई (Mumbai) ही महाराष्ट्राची होती आणि महाराष्ट्राची राहणार आहे. मुंबईच्या बाबतीत भाजपची रणणीती स्पष्ट आहे. त्यांना मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायची आहे. दुसरीकडे, आमची 25 वर्षे युतीमध्ये सडली. महागाईच्या मुद्यावर युध्दाचा मुद्दा उपस्थित करत लोकांच्या डोक्यातून महागाईचा मुद्दा घालवला जातोय. काश्मीरमध्ये हिंदूची हत्या वाढत आहेत. सध्या जे काही काश्मीर सुरु ते खूप भयानक आहे.'

CM Uddhav Thackeray
School Reopen|'काळजी घ्या' चिमुकल्यांना मुख्यमंत्री उध्दव काकांचा सल्ला

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, ''आमचं हिंदुत्व खरं की खोटं हे ठरवण्याचा भाजपवाल्यांना कोणी अधिकार दिला. आम्ही सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसबरोबर गेलो यात काय गैर केले. आज जे काही काश्मीरमध्ये चालू आहे, ते मागेही सुरु होतं. सरकार स्थापन करण्यासाठी याच भाजपने मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर हातमिळवणी केली. हे ह्यांचं हिंदुत्व आहे. बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल त्याचा आम्हाला अभिमान आहे, असं शिवसेनाप्रमुखांनी म्हटलं होतं. हिंदुत्व हे डोक्यात असायला पाहिजे टोपी घालून ते येत नाही. हिंदुत्वाच्या नावावरुन राज्यातील आणि देशातील जनतेला भडकवण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. याच हिंदुत्वाच्या नावावर खोटही बोललं जात आहे. भाजपचे लोक मनोरुग्ण आहेत.''

CM Uddhav Thackeray
''जनतेसाठी मुख्यमंत्री असतो''; पर्रीकरांचा फोटो शेअर करत उध्दव ठाकरेंना टोला

आदित्य ठाकरे म्हणाले, जय महाराष्ट्र, शिवसैनिक म्हणजे आमचे कवच कुंडल आहेत. जनतेच्या आशिर्वादामुळे आम्ही इथे मंत्री म्हणून बसलो आहोत. कोरोना काळ संपल्यानंतर पहिल्यांदाच अशी विराट सभा होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच शिवसेना नेत्यांसह अनेक मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केलं. कोरोना काळात राबवलेल्या धारावी पॅटर्नची दखल डब्ल्यूएचओला घ्यावी लागली. त्याचबरोबर मुंबईच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. राज्याचं अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने खऱ्या अर्थाने काम केले. परंतु राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या रंगाभोवती फिरत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com